विमानप्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागत असले तरीही रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या तुलनेत हा प्रवास अधिक वेगवान होतो आणि यात वेळेचीही तितकीच बचत होते.
फ्लाईटमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी पायलट अर्थात वैमानिकासमवेत केबिन क्रू मेंबरही असतात. एअर होस्टेसही त्याच क्रूचा एक भाग.
प्रवाशांची विशेष काळजी घेणं हे एअर होस्टेसचं मुख्य काम असतं. प्रवाशांच्या स्वागतापासून जोपर्यंत प्रवासी विमानाबाहेर पडत नाहीत तोपर्यंत या हवाई सुंदऱ्या त्यांच्या सेवेत हजर असतात.
विमानप्रवासांतर एअर होस्टेसचं काम संपतं असं नाही. विमानाचा एक प्रवास संपल्यानंतर लगेचच पुढील प्रवासासाठीची तयारी सुरू होते.
विमानामधील स्वच्छता, पुढील उड्डाणाआधीचं रिस्टॉकिंग अर्थात पुढील प्रवासातील प्रवाशांसाठीच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी या सर्व व्यवस्था एअर होस्टेस करतात.
फ्लाईटचं फिडबॅक तयार करण्यापासून इतर कागदोपत्री व्यवहार आणि तत्सम अहवाल तयार करण्याचं काम या एअर होस्टेस विमान प्रवास संपल्यानंतर करतात. (सर्व छायाचित्र- फ्रीपिक)