चपात्या आपण रोजच खातो. त्यामुळं कणिक मळताना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे
कणिक मळताना त्यात काही पदार्थ मिसळा ज्यामुळं आरोग्यही सुधारेल आणि चवही छान राहिल
तुम्ही ओवा, आळशी, राजगीर, सफेद तिळ, धणे पावडर यासगळ्याची एकत्रित पावडर बनवून घ्या आणि एका डब्यात ठेवून घ्या
जेव्हा तुम्ही पीठ मळाल तेव्हा ही पावडर त्यात मिसळा आणि पोळ्या लाटून घ्या
ओव्यात अँटीऑक्सिडेंट्स असतात जे शरीर स्वस्थ राहण्यास मदत करतात.
आळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, राजगीरमध्ये फायबरची मात्रा अधिक असते. सफेद तिळात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते जे हाडांना बळकटी देते
धण्यांमध्ये व्हिटॅमिन सी असतं जो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)