'या' लाल किड्यापासून बनवतात आईस्क्रीम आणि जाममध्ये वापरला जाणारा रंग

Diksha Patil
Oct 19,2024

कारमाइन रंग कोणता असतो?

कारमाइन एक असा रंग आहे जो Cochineal नावाच्या किड्यापासून बनवण्यात येतो. हा रंग आईस्क्रीम , जॅम आणि मिठाईमध्ये वापरण्यात येतो.

Cochineal किड्याचा वापर

हे किडे दक्षिण अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मिळतो. या किड्याला सुकवून त्याचा लाल रंग काढण्यात येतो.

कारमाइन बनवण्याची पद्धत?

Cochineal कीड्याला वाळवतात त्यानंतर त्याची पावडर करतात आणि त्याचा वापर खाण्यात, कॉस्मॅटिक आणि औषधांमध्ये वापरण्यात येतो.

दुसरं नावं काय?

कारमाइनला आणखी नावं आहेत, जसं कोचिनील एक्सट्रॅक्ट, नॅचुरल रेड 4, E120 म्हणुन देखील ओळखतात.

खाण्यात कारमाइन?

आईस्क्रीम , जॅम, योगर्ट आणि कॅन्डीमध्ये या रंगाचा वापर होतो. हा एक नॅच्युरल रंग आहे. जो खाण्यात वापरणं सेफ आहे.

किती किडे?

1 पाउंड कारमाइन बनवण्यासाठी जवळपास 70,000 Cochineal किड्यांची गरज असते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story