पृथ्वी नष्ट होईल अशा अनेक कहाण्या आपण ऐकल्या असतील.
याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जातात.
पृथ्वीवर 5 वेळा महाप्रलय आला ज्यामुळे सर्वकाही नष्ट झाले.
पण पृथ्वी किती वर्षांनी नष्ट होईल? तुम्हाला माहिती आहे का?
पृथ्वीची जीवनरेषा कुठपर्यंत आहे? हे आपण जाणून घेऊया.
अस्ट्रॉनॉमीनुसार पृथ्वीवर 4 ते 5 अरब वर्षापुर्वी जीवन सुरु झालं.
यामध्ये एका रिसर्च पेपरचा उल्लेख करण्यात आलाय. जो न्यूयॉर्क विद्यापीठात 1994 साली छापला गेला.
यानुसार 1.5 अरब वर्षानंतर पृथ्वीवरील तापमान इतके वाढेल की महासागराचे बाष्पीभवन होईल.
याप्रकारे पृथ्वीचे आयुष्य संपेल. हळुहळू याची लक्षणे दिसू लागली आहेत.
यानुसार साधारण 5 ते 7 अरब वर्षानंतर पृथ्वी संभाव्यता नष्ट होईल.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)