ब्रेड, 1/2 कप दूध, 1 कप साखर, 1 कप पाणी, 1/4 चमचा वेलची पावडर, तळण्यासाठी तेल किंवा तूप
ब्रेड स्लाइसचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या. आता त्यात थोडं थोडं दूध टाकून पीठाप्रमाणे मळून घ्या
साखर आणि पाणी यांचे मिश्रण 5 ते 7 मिनिटांपर्यंत उकळून साखरेचा पाक तयार करुन घ्या. आता त्याच वेलची पावडर टाकून पाक थंड होण्यासाठी ठेवा
आता ब्रेडच्या पीठाचे लहान लहान गोळे करुन घ्या. आता तेलात डिप फ्राय करुन घ्या. गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या
नंतर आता तळलेले गुलाबजाम थंड झालेल्या साखरेच्या पाकात टाका आणि 1-2 तासांपर्यंत ठेवून द्या
ब्रेडचे गुलाबजाम तयार आहेत. तुम्ही दिवाळीसाठी हा पदार्थ करु शकता.