पाणी हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या तत्वांपैकी एक असून यामुळे शरीर हायड्रेटचं राहत नाही तर शरीरातील सर्व अवयव सुरळीत ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते.
तज्ज्ञांच्यानुसार दिवसभरात योग्य वेळी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिणं चांगलं ठरतं असं तज्ज्ञ सांगतात. पण हे पाणी योग्य वेळी प्यायल्याने जास्त फायदे मिळतात.
तेव्हा पाणी पिण्यासाठी दिवसातील 4 सर्वोत्तम वेळा कोणत्या याबाबत जाणून घेऊयात.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. झोपल्यावर रात्रभर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. तेव्हा सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि दूषित पदार्थ बाहेर निघतात.
सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते आणि पचनक्रिया उत्तम राहते.
जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे ही चांगली सवय मानली जाते. यामुळे तुमची पाचक प्रणाली सक्रिय करते आणि तुमचे अन्न सहज पचण्यास मदत करते.
जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांनी वर्क आउट करण्याआधी आणि नंतर पाणी प्यावे.
व्यायामाच्या आधी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्यावे, तसेच व्यायामानंतर घामा वाटे शरीरातील पाणी बाहेर पडते त्यामुळे व्यायामाच्या आधी आणि नंतर पाणी पिणे गरजेचे आहे.
रात्री झोपवण्यापूर्वी पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगली सवय आहे. यामुळे रात्रभर शरीर हायड्रेट राहते आणि किडनी साफ होण्यास मदत मिळते.
रात्री झोपण्यापूर्वी केवळ एक ग्लास पाणी प्यावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)