अंतराळवीरांना कायमच पांढरे स्पेससूटच का दिले जातात? त्यांचे स्पेससूट विविधरंगी का नसतात? तर, यामागे आहे खास कारण.
अंतराळवीरांसाठी अॅडवांस्ड क्रू एस्केप सूट आणि एक्स्ट्रा व्हीक्युलर अॅक्टीव्हिटी सूट अशा दोन प्रकारचे सूट असतात.
अंतराळवीरांचा नारंगी सूट अॅडवांस श्रेणीतील असतो. तर पांढरा सूट एक्स्ट्रा व्हीक्युलर अॅक्टीव्हिटी श्रेणीत येतो.
कपड्यांनुसार अंतराळातील प्रवास दोन टप्प्यांमध्ये होतो. एक म्हणजे पृथ्वीपासून लाँच होईपर्यंत आणि दुसरा टप्पा अंतराळात प्रवेश केल्यानंतरचा.
अंतराळयान लाँच होताना अंतराळवीरांना नारंगी सूट दिला जातो. अवकाशयान पुढे जाताना त्याचा बॅग्राऊंड रंग निळा होतो तर अंतराळात काळा.
अवकाशात सूर्यकिरणं अतिशय तीव्र असतात. या उष्णतेपासून बचावासाठी इथं पांढऱ्या रंगाचा सर्वाधिक वापर केला जातो. जेणेकरून हा रंग वातावरणात React होणार नाही.