व्हिजाशिवाय 'या' 8 देशांमध्ये फिरु शकतात भारतातील लोक!

Feb 09,2025

भूतान

भूतानमध्ये फिरण्यासाठी भारतीयांना व्हिजाची गरज भासत नाही. पासपोर्ट नसल्यास वोटींग आयडी कार्डच्या मदतीने भूतानमध्ये फिरता येऊ शकते.

मालदीव

भारतीयांच्या बकेट लिस्टमध्ये असणाऱ्या मालदीव या देशात भारतीय व्हिजाशिवाय जाऊ शकतात, तसेच तिथे 30 दिवस राहू शकतात.

बारबाडोस

बारबाडोस हा देश सुंदर बेटांसाठी तसेच तेथील संस्कृतीसाठी ओळखले जाते. या देशात भारतीय व्हिजाशिवाय 90 दिवस राहू शकतात.

श्रीलंका

1 ऑक्टोबर 2024 पासून श्रीलंका हा देश भारतीयांना फिरण्यासाठी व्हिजा-फ्री करण्यात आला आहे. या देशात व्हिजाशिवाय 6 महिन्यांपर्यंत राहता येऊ शकते.

मॉरीशस

नयनरम्य समुद्रकिनारे, लॅगून तसेच करोल रीफसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॉरीशसमध्ये व्हिजाशिवाय फिरता येऊ शकते.

फिजी

पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फिजी या देशात व्हिजा नसल्यावर फिरण्याची परवानगी आहे.

त्रिनिनाद एंड टोबॅगो

त्रिनिनाद एंड टोबॅगो या देशात भारतीय पर्यटक हे 30 दिवसांपर्यंत फिरु शकतात.

अल सल्वाडोर

ऐतिहासिक वास्तू तसेच सुंदर डोंगरदऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अल सल्वाडोर या देशात भारतीय पर्यटक व्हिजाशिवाय 180 दिवस राहू शकतात.

VIEW ALL

Read Next Story