जंगलांना पृथ्वीचं फुफ्फुसं असं म्हटलं जातं.
पूर्ण पृथ्वीचा 31 टक्के भाग जंगलाने व्यापलाय.
आज आपण जगातील सर्वात मोठ्या जंगलाबद्दल जाणून घेऊया.
अमेझॉनचं जंगल जगातील सर्वात मोठं जंगल म्हटलं जातं.
याचा आकार 23 दशलक्ष वर्ग मैलापर्यंत पसरलंय.
ब्राझील,बोलीविया, कोलंबिया,इक्वाडोर, फ्रेंच, गुयाना, पेरु,वेनेजुएला आणि सूरीनाम गणराज्यपर्यंत याचे क्षेत्रफळ पसरले आहे.
येथे रोज एक प्रजाती सापडते, असे अमेझॉनच्या जंगलाबाबत म्हटलं जातं.
यानंतर कांगोच्या जंगलाचा दुसरा क्रमांक आहे.
हे जंगल आफ्रीकेच्या कांगो बेसिनमध्ये 1 लाख 40 हजार वर्ग मैलहून अधिक क्षेत्रात पसरलं आहे.
कॅमरुन आणि मध्य आफ्रीकी गणराज्य, कांगो, गणराज्य, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, इक्वेटोरियल गिनी आणि गॅबोनपर्यंत जंगल आहे.