या ठिकाणी दगडं कोसळत असतानाचा आवाज सतत येत असतो, जो फार भीतीदायक असतो असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
वैज्ञानिकांनी 1997 रोजी पॉइंट निमो येथे एक रहस्यमयी आवाज ऐकला होता.जवळपास दोन हजार किमी दूर अंतरावरुन हा आवाज ऐकण्यात आला होता.
या ठिकाणी हजारो किमीपर्यंत सॅटलाइटचा मलबा पडलेला आहे. समुद्राच्या मधोमध वसलेल्या पॉइंट निमोला समुद्राचं केंद्रही मानलं जातं.
सॅटलाइटमधून इंधन खाली पाडण्यासाठीही या जागेचा वापर केला जातो. तसंच सॅटेलाइटमधील भंगार एकत्र करण्यासाठीही या जागेचा वापर होतो.
1992 मध्ये एका सर्व्हे इंजिनिअरने पॉइंट निमोचा शोध लावला होता. त्यांचं नाव हर्वोज लुकातेला होतं. या ठिकाणी कोणतीही व्यक्ती किंवा वनस्पती सापडणार नाही.
शहरी वस्तीपासून फार दूर असणाऱ्या या ठिकाणी पोहोचणं सोपं नाही. या ठिकाणी चारही बाजूला फक्त भयाण शांतता आहे.
पॉइंट निमो (Point Nemo) असं या जागेचं नाव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या जागेचा शोध लावणारे वैज्ञानिकही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
पृथ्वीवर एक अशी जागा आहे जी चारही बाजूंनी प्रशांत महासागराने घेरलेली आहे.