वेगाशीसुद्धा शर्यत लावणाऱ्या, वाऱ्यावर स्वार होणाऱ्या या रायडर्सना त्यांच्या या कौशल्यासाठी किती पगार मोजला जातो माहितीये?
जागतिक स्तरावरील क्रॅश या संकेतस्थळाच्या माहितीनुसार या रायडर्सना कैक कोटी रुपयांमध्ये पगाराची रक्कम मिळते. इथंही सर्वाधिक कमाई करणाऱ्या रेसर्सची यादी नजरा वळवते.
फ्रँको मॉर्बिडेली यामाहा टीमचा भाग असून, एका पर्वासाठी तो साधारण 3 मिलियन युरो म्हणजेच 26 कोटी 58 लाख रुपये इतकी रक्कम घेतो.
आतापर्यंत दोन किताबांवर नाव कोरणारा अॅलेक्स मार्केज डुकाटीचा लीडर असून, तो 1 मिलियन युरो म्हणजेच 8 कोटी 85 लाख रुपये घेतो.
अप्रिलिया रेसिंग टीमचा भाग असणारा मॅवरिक विनालेस 2 मिलियन युरो म्हणजेच साधारण 17 कोटी 71 लाख रुपये इतकी रक्कम घेतो.
सहा वेळी मोटोजीपी रेस जिंकणारा अॅलेक्स रिन्स एका सीजनसाठी 3 मिलियन युरो म्हणजे 26.58 कोटी रुपये घेतो. या यादीत मार्क मार्केज आघाडीवर असून तो एका सीजनसाठी तब्बल 12 .5 मिलियन युरो म्हणजेच 111 कोटी रुपये इतकी रक्कम घेतो.
पोल एस्पारगारो गॅसगॅस टीममधून मोटोजीपीच्या ट्रॅकवर उतरतो. तो एका पर्वासाठी साधारण 3.5 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 31 कोटी रुपये घेतो.य