जियोकेमिकल पर्सपेक्टिव्स लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालानुसार चंद्राचं वय 4.46 अब्ज वर्षे इतकं आहे.
फील्ड संग्रहालयातील हवामानशास्त्र आणि ध्रुवीय अध्ययनातील रॉबर्ट ए प्रित्जकर, क्युरेटर फिलिप हॅक आणि ग्लासगो विश्वविद्यालयातील जेनिका ग्रीर यांनी या संशोधनाचं नेतृत्त्वं केलं होतं.
चंद्राचं वय शोधण्यासाठी करण्यात आलेल्या या संशोधनासाठी चंद्रावरून आणलेल्या धुळीचे कैक वर्षांपूर्वी तयार झालेले कण वापरण्यात आले होते.
ज्यावेळी मंगळाच्या आकाराची एक वस्तू पृथ्वीवर आदळली होती तेव्हाच चंद्राचा जन्म झाला होता याचा दाखला या धुळीच्या माध्यमातून मिळाला.
चंद्राचा जन्म झाला तेव्हा त्या उर्जेमुळं एक मोठा पर्वत वितळला आणि त्यातूनच चंद्राचा पृष्ठभाग तयार झाला. असंही या संशोधनातून समोर आलं.
चंद्राच्या पृष्ठावरील कोणताही स्फटीक तेथील मॅग्मा महासागर थंड झाल्यावरच निर्माण झाला असेल. ज्यामुळं चंद्राच्या वयाचा अंदाज लावता येणं शक्य झालं.
एकंदर अध्ययनाचा संदर्भ पाहता चंद्राचं वय 4.46 अब्ज वर्षे इतकं असून तो आपल्या सूर्यमालेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत आहे.