दुसरीकडे द केरळ स्टोरी चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. रविवारपर्यंत हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश करेल अशी शक्यता आहे.
ईदच्या दिवशी सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने दमदार कमाई केली. पण हळूहळू प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला आणि चित्रपट 110 कोटी रुपयांची कमाई करु शकला.
यावर्षी अजय देवगनचा 'भोला' हा चित्रपट मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने सहा आठवड्यात केवळ 91 कोटी रुपयांची कमाई केली.
शुक्रावीर द केरळ स्टोरी चित्रपटाचा आठवा दिवस होता. ट्रेड रिपोर्टनुसार या चित्रपटाने एका दिवसात 12.23 कोटींची कमाई केली.
शुक्रावीर द केरळ स्टोरी चित्रपटाचा आठवा दिवस होता. ट्रेड रिपोर्टनुसार या चित्रपटाने एका दिवसात 12.23 कोटींची कमाई केली.
अभिनेत्री अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 8 कोटींची ओपनिंग करत सर्व अंदाज खोटे ठरवले. 5 मेला देशभरा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईचा आलेख उंचावला.
मोठी स्टारकास्ट किंवा मोठा फिल्म कंपनी नसतानाही 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट फारतर 4 ते 5 कोटी रुपयांची कमाई करु शकेल असा अंदाज वर्तवला जात होता.