परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा हे 24 सप्टेंबर रोजी लग्न बंधनात अडकले.
परिणीति आणि राघव यांनी लग्नाच्या आधी पारंपारिक कार्यक्रम न ठेवता वेगळे खेळ खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
परिणीति आणि राघव यांच्या या कार्यक्रमाचे नाव 'द चोप्रा वर्सेज द चड्ढा' असे ठेवण्यात आले होते.
चोप्रा आणि चड्ढा दोन्ही कुटुंबानं याचा आनंद घेतला आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगनं देखील त्यांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती.
हरभजन सिंग हा सुरुवातीला टीम चड्ढामध्ये होता. तर त्यानंतर सिमरननं त्याची टीम बदलत त्याला टीम चोप्रामध्ये घेतलं.
राघव यांनी शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत हरभजन म्हणाला, 'खूप मज्जा आली. आनंद जाला... चोप्रा यांनी मला चड्ढामधून चोप्राच्या टीममध्ये शामिल करून घेतलं. आणखी एक कमेंट करत हरभजन पुढे म्हणाला, सिमरन हे योग्य केलं नाहीस... मी चोप्रा टीममध्ये आल्यानं राघव आनंदी नाही.' (All Photo Credit : Raghav Chadha/ Parineeti Chopra Instagram)