रणबीर कपूर व कतरिना कैफचा 'अजब प्रेम की गजब कहानी' हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना फारच आवडला होता.
आता सतत थिएटरमध्ये सुरु असलेल्या इतर चित्रपटांच्या रि-रिलीजमध्ये हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
25 ऑक्टोबरला हा चित्रपट तुम्हाला थिएटरमध्ये पाहता येणार आहे.
'TIPS'यांच्या ऑफिशियल पेजवर 22 ऑक्टोबरलाच 'Celebrate love and friendship as Prem and Jenny return to cinemas!' असा कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे.
या चित्रपटात 'Happy club' नावाचा मित्रांचा ग्रुप असून एक सुंदर मैत्री व प्रेमाचे नाते दाखवलं आहे.