चिकन की मटण, कोण सूप आजारपणात पिणं फायदेशीर?
आजारपणात तोंडाची चव जाते. त्यामुळे अन्न खाण्याची इच्छा होत नाही. अशात महिला चिकन किंवा मटनचं सूप बनवतात.
आजारपणात शरीराला ताकद आणि तोंडाल चव यावी, यासाठी चिकन किंवा मटणाचे सूप दिलं जातं.
पण आजारपणात चिकन की मटण कोणतं सूप पिणे जास्त फायदेशीर आहे तुम्हाला माहितीये?
तज्ज्ञ सांगतात की, मटणाच्या नळ्या खूप भक्कम असतात. तर चिकन जास्त पौष्टिक असतं.
तज्ज्ञ सांगतात की, दररोज 50 ग्रॅम जरी चिकन खाल्लं तरी ते शरिरासाठी फायद्याचं ठरतं. त्यात बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीचं चिकन जास्त फायदेशीर मानलं जातं.
पण आजारी व्यक्तीला चिकन पेक्षा मटणाचे सूप प्यायला दिलं पाहिजे. खास करुन पाया सूप हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.