फणसासासखंच दिसणारं हे फळ आरोग्यासाठी कमालीचं फायदेशीर असतं. या फळाचं नाव आहे डूरियन.
प्रोटीन, व्हिटामिन, कॅल्शियम, पोटॅशियम अशी पोषक तत्त्वं या फळामध्ये आढळतात.
पोटॅशियमचं प्रमाण अधिक असल्यानं हे फळ हृदयरोग असणाऱ्यांसाठी फायद्याचं ठरतं. यामुळं रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.
डूरियन फळामध्ये व्हिटामिन सी चं प्रमाण जास्त असून, त्यामुळं चेहऱ्यावर लकाकी येते.
रक्तातील साखरेचं प्रमाणही या फळाच्या सेवनामुळं नियंत्रणात राहतं. मधुमेहींसाठी हे फळ अतिशय फायदेशीर.
तंतूमय घटकांचं प्रमाण जास्त असल्यामुळं या फळाच्या सेवनानं पचनक्रिया उत्तमरित्या काम करते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)