चिरलेली फळे किती काळापर्यंत खाण्यास योग्य?
फळांमध्ये बरेच व्हिटॅमिन्स आणि पोषकत्त्व असतात. त्यामुळे आपल्या नेहमीच्या आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत असतात.
अनेकजण बऱ्याचदा फळे चिरल्यानंतर काही काळानंतर त्यांचे सेवन करतात. चिरलेली फळे नेमकी किती काळापर्यंत खाण्यासाठी योग्य असतात?
तज्ज्ञांच्या मते, फळे आधी धुवून घेतली पाहिजेत. त्यानंतर ती चिरुन लगेच त्यांचे सेवन केल्याने शरीरासाठी ते फायदेशीर ठरते.
सफरचंद सालासकट खाणे हे आरोग्यासाठी अधिक लाभदायक असल्याचं सांगितलं जातं. मात्र, किडनी किंवा लिव्हरशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्यांनी सफरचंद सोलून खाल्ले पाहिजे.
व्हिटॅमिन सी युक्त फळे ही अधिक काळ सोलून किंवा चिरुन अधिक काळ ठेवल्याने फळांमध्ये कडवटपणा जाणवतो. तसेच, अशा फळांचे सेवन शरीराला नुकसान पोहचवू शकते.
तज्ज्ञांच्या मते, नेहमी ताज्या फळांचे सेवन केल्याने शरीराला योग्य प्रमाणात पोषकत्त्व मिळतात.
हिवाळ्यात चिरलेली फळे किंवा फ्रिजमध्ये चिरुन ठेवलेली फळे ही 1 ते 2 तासांपर्यंत खाण्योग्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मिठाच्या पाण्यात फळे धुतल्याने बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्याच्या ऋतूत फळे चिरल्यानंतर लगेचच त्याचे सेवन करायला हवे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)