तुळशीच्या पानांमुळे गर्भवती महिलेच्या गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यात एस्ट्रोगोलची उपस्थिती देखील गर्भपातास कारणीभूत ठरू शकते. तुळशीच्या पानांचा महिलांच्या मासिक पाळीवरही परिणाम होतो.
मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) चायनीज फूडमध्ये असते, ज्यामुळे बाळाच्या जन्मानंतर काही प्रकारची शारीरिक कमतरता दिसू शकते. तसेच सोया सॉसमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने गर्भवती महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
गरोदरपणात अननस खाणं महिलांसाठी हानीकारक ठरू शकतं. अननस हा एक स्वादिष्ट आणि शरीरासाठी गुणकारी पदार्थ आहे. मात्र हे फळ गर्भवती स्त्रीयांसाठी हानीकारक ठरू शकते.
पपई हे फळ महिलांना जास्त आवडतं. पपईमुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. नजर चांगली होण्यासाठी पपई जास्त प्रमाणात खाल्ली जाते. मात्र, गरोदरपणात महिलांनी पपई खाऊ नये.
व्हिटॅमिन्स आणि आवश्यक न्यूट्रिएंट्सनं परिपूर्ण असं खजूर गरोदरपणात खाऊ नये. खजूराच्या सेवनाने शरीराचं तापमान वाढतं आणि गर्भाशय आकुंचित होत. दिवसाला एक किंवा 2 खजूर खाणं ठिक आहेत.
द्राक्ष हे पचनाला जड असतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी द्राक्षाचे सेवन करू नये. आई आणि बाळ या दोघांकरिता हे फळ धोकादायक ठरू शकतं. द्राक्षातील रेस्वेरास्ट्रोल नावाचा पदार्थ शरीरातील हार्मोनला असंतुलित करतो.