एकसम जुळ्या मुलांचे फिंगरप्रिंट एकसारखे असतात का?

Jul 05,2024


एखाद्या व्यक्तीच्या बोटांवरील कड्यांची रचना आयुष्यभर सारखीच राहते, ज्यामुळे बोटांचे ठसे ओळखण्यासाठी उपयुक्त ठरतं. गुन्हेगारांना पकडण्यासाठी फिंगरप्रिंट्सचा वापर केला जातो.


दोन लोकांच्या बोटांचे ठसे एकसारखे असण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे एकसारखेच दिसण्यासाठी एक दशलक्षाहून अधिक वर्षे लागतील, असं संशोधकांचं मत आहे.


जुळ्या मुलांचा रंग, उंची, डोळे अगदी हुबेहुब असतात. मग एकसम जुळ्या मुलांचे फिंगरप्रिंट एकसारखे असतात का?


जगात जन्मणाऱ्या प्रत्येक 42 बाळांमागे एक जुळं असतं. आयव्हीएफसारख्या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वाढता वापर. यामुळे जुळी अपत्यं जन्माला येण्याचं प्रमाण वाढलं आहे


पण जुळ्या मुलांच्या बोटांचे ठसेही सारखे नसतात. कारण गर्भाच्या विकासादरम्यान बोटांच्या ठशांवर अनुवांशिक आणि पर्यावरणीय दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.


आईच्या पोटातच मुलाच्या हातावर प्रिंट तयार होतात. ही प्रक्रिया गर्भधारणेच्या 12 ते 18 आठवड्यांच्या दरम्यान होते.


जनुकांसोबतच इतरही अनेक घटक आहेत ज्यामुळे जुळ्या मुलांच्या बोटांच्या ठशांमध्ये फरक पडतो. गर्भाशयातील पोषण पातळी, नाभीसंबधीची लांबी, रक्ताची उपलब्धता, गर्भाशयातील अम्नीओटिक सॅकशी संपर्क या गोष्टी कारणीभूत ठरतात.


फिंगरप्रिंट्स केवळ अनुवांशिकतेनुसार निर्धारित केले जात नाहीत. ते गर्भाशयात असताना गर्भाला स्पर्श करत असलेल्या गोष्टींवरही निर्धारित असतात. म्हणून जुळ्या मुलांच्या बोटांचे ठसे भिन्न असतात.

VIEW ALL

Read Next Story