पालक कोणी खाऊ नये?

तेजश्री गायकवाड
Jan 13,2025


पालक हे पोषक तत्वांनी युक्त हिरवी पालेभाजी आहे. त्यात अनेक पोषक घटक असतात.


पालक खाणे बहुतेक लोकांसाठी फायदेशीर असले तरी काही लोकांनी ते खाणे टाळावे किंवा सावधगिरीने खावे.

किडनी रोग

पालकमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, जे किडनी स्टोन तयार करण्यास उपयुक्त ठरू शकते. जर एखाद्या व्यक्तीला किडनीची समस्या किंवा किडनी स्टोनची समस्या असेल तर त्याने पालकाचे सेवन टाळावे.

थायरॉईडचे रुग्ण

पालकामध्ये गोइट्रोजेनिक घटक असतात, जे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम करू शकतात. यामुळेच थायरॉईडची समस्या असल्यास पालक खाऊ नये.

पोटाशी संबंधित समस्या

पालक खाल्ल्याने काही लोकांमध्ये पोटदुखी किंवा अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कारण, यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

ऍलर्जी असलेले लोक

काही लोकांना पालकाची ऍलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला पालकाची ऍलर्जी असेल तर त्याने पालक खाणे पूर्णपणे टाळावे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story