भारतातील सर्वाधिक जनता दैनंदिन प्रवासासाठी रेल्वेचा वापर करते. सामान्यांच्या खिशाला परवडणारा हा प्रवास सुरक्षिततेच्या कारणास्तवही लोकप्रिय.
तुम्हाला माहितीये का, भारतात एक असंही रेल्वे स्थानक आहे जिथं पोहोचण्यासाठी तुम्हाला व्हिसाची आवश्यकता असते. तुम्हाला माहितीये का देशातील असं एक बहुचर्चित रेल्वेस्थानक?
पंजाबमधील अमृतसर मध्ये असणाऱ्या या रेल्वे स्थानकाचं नाव आहे अटारी सिंह रेल्वे स्थानक. हे रेल्वे स्थानक फिरोजपूर रेल्वेच्या नियंत्रणात येतं.
अटारी भारतातील अखेरचं रेल्वे स्थानक असून, याच्या एका बाजूला भारताचं अमृतसर तर, दुसऱ्या बाजूला पाकिस्तानातील लाहोर आहे.
इथं पोहोचण्यासाठी पाकिस्तानची परवानगी आणि तिकीटासाठी पासपोर्ट क्रमांक, व्हिसा आवश्यक असतो.
या स्थानकापर्यंत अर्थात पाकिस्तानपर्यंत समझौता एक्स्प्रेस रेल्वे सुरू असून इतर कोणतीही रेल्वे या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही.