देशभरात नवरात्रीची तयारी जोशपूर्ण वातावरणात चालू झाली आहे.
चला तर मग नवरात्रीबद्दल जाणून घेऊ अशा काही गोष्टी ज्या तुम्ही याआधी कधीही ऐकल्या नसतील.
दुर्गा माता हे देवीचे एकमेव स्वरूप आहे, जिच्या हाती शंकराचा त्रिशूल, विष्णूचे चक्र आणि ब्रम्हाचे कमळ धरण केले असते.
देवीच्या अंगी सर्व देवदेवतांच्या शक्तीचा अंश असल्याने तिला 'शक्ति' असे संबोधले जाते.
दुर्गा मातेला 'अष्टभुजा' असेही म्हंटले जाते. हे आठ हात वास्तुशास्त्रातील आठ दिशा दर्शवतात.
महिषासुरमर्दिनी असे जिला म्हंटले जाते, त्याच महिषासुरचा वध करण्यासाठी देवीला 9 दिवस लागले होते. आणि यामुळेच नवरात्रीत आपण 9 दिवस मातेची पूजा करतो.
पुराणात अशी मान्यता आहे की, देवीआई दु:ख आणि वाईटाचा नाश करण्यासाठी सिंहावर आरुढ होऊन येते.
शास्त्रांचे जाणकार असे सांगतात की दुर्गामातेचे 3 डोळे हे अग्नि, सूर्य आणि चंद्राचे प्रतीक आहेत. (येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. Zee 24 Taas याची पुष्टी करत नाही.)