काँग्रेस नेत्याने केली होती विनंती

काँग्रेस नेते दिनेश गुलीगौडा यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना पत्र लिहून या योजनेंतर्गत दरमहा देवी यांना दोन हजार रुपये देण्याची विनंती केली होती.

Nov 17,2023

पैसे जमा करण्याचे निर्देश

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख शिवकुमार यांनीही या प्रस्तावाला सहमती दर्शवली आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना दरमहा ही रक्कम मंदिराच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले.

पैसे जमा करुन योजनेची सुरुवात

कर्नाटक सरकारने 30 ऑगस्ट रोजी म्हैसूर येथील देवी चामुंडेश्वरी मंदिरात पहिला हप्ता जमा करून 'गृहलक्ष्मी' योजना सुरू केली होती.

मुख्यमंत्र्यांनी केली होती प्रार्थना

पैसे देवीला अर्पण करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी योजनेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना केली होती. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करणे हा आहे.

चामुंडेश्वरी मंदिराचा इतिहास काय आहे?

माता चामुंडा या हजारो वर्षे जुन्या मंदिराची मुख्य देवी आहे. याचे वर्णन देवी पुराण आणि स्कंद पुराणात आढळते.

महिषासुराला केलं ठार

पुराणानुसार जेव्हा महिषासुराला वरदान मिळाले तेव्हा त्याने देवांचा छळ सुरू केला. तेव्हा महिषासुराचा वध करण्यासाठी माता दुर्गेने चामुंडाचे रूप धारण केले. नंतर या ठिकाणी माता चामुंडाने राक्षसाचा वध केला.

VIEW ALL

Read Next Story