भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये योगदान देणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसेनानींमध्ये आदरानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे, नेताजी सुभाषचंद्र बोस.
बोस यांना नेताजी ही उपाधी जर्मनीचा हुकूमशाह अडॉल्फ हिटलर यानं दिली होती.
1942 मध्ये बोस आणि हिटलर यांची भेट झाली होती. असं म्हणतात की बोस हिटलरकडे भारताला स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव घेऊन गेले होते.
उपलब्ध माहितीनुसार हिटलरनं मात्र यामध्ये काही स्वारस्य दाखवलं नव्हतं. सुभाषचंद्र बोस यांना हिटलरनं कोणतंही स्पष्ट वचनही दिलं नव्हतं.
हिटलर ही तीच व्यक्ती होती, ज्यानं बोस यांना पहिल्यांना नेताजी ही उपाधी दिली होती.
इथून पुढे ते याच उपाधीमुळं ओळखले गेले. याव्यतिरिक्त देशाचे नायक, अशीही उपाधी त्यांना मिळाली असून, रवींद्रनाथ टागोर यांनी ही उपाधी त्यांना दिली होती.