भारतातील सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या राज्यात राहतात?
भारतात आजही अशी राज्य आहेत, जी आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत.
भारतात सर्वाधिक गरीब लोक कुठल्या राज्यात राहतात याबद्दल तुम्हाला माहितीये का?
UNDP च्या अहवालानुसार बिहार हे भारतातील सर्वात गरीब राज्य आहे.
बिहारमधील 33.76 टक्के लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली जगतात.
बिहारनंतर झारखंड गरिबीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येतं.
झारखंडमध्ये सुमारे 28.81 टक्के लोकसंख्या गरिबीत जगतात.
तर तिसऱ्या क्रमांकावर मेघालय हे राज्य येतं.
दरडोई उत्पन्न पाहिलं तर बिहारमध्ये ते 32.8 टक्के एवढं आहे.
झारखंडचे दरडोई उत्पन्न फक्त 57.2 टक्के तर उत्तर प्रदेशाचे 50.8 टक्के आहे.