दिव्याच्या वाचलेल्या वातीचं काय करायचं? फेकून देण्याची चूक करु नका

Shivraj Yadav
Feb 04,2025

हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याची प्रथा आहे. ज्या घरात दिवा लावला जातो, तिथे सुख आणि शांतता नांदते असं म्हणतात.

त्यामुळे जवळपास प्रत्यके घरात दिवा लागतो. पण दिवा विझल्यानंतर त्यात वात शिल्लक राहते.

त्या वातीचं नेमकं काय करावं, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? की तुम्ही ती फेकून देता.

जर तुम्ही काही विचार न करता वात फेकून देत असाल तर ही चूक करु नका.

दिव्यातील वाचलेल्या वातीला कधीही कचरा समजून इकडे तिकडे फेकू नये. हे अशुभ मानलं जातं.

जर फेकणं अशुभ असेल तर मग नेमकं त्याचं काय करावं असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे.

तुम्ही ही वात एखाद्या स्वच्छ ठिकाणी मातीत पुरू शकता.

एखाद्या पूजल्या जाणाऱ्या ठिकाणी झाडाच्या खालीदेखील तिला पुरु शकता. हा सर्वोत्तम पर्याय आहे.

अशाने घरात सुख आणि शांतता नांदेल असं म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story