भारतात नद्यांना धार्मिक कार्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
भारतात जवळपास 400 नद्या वाहतात. परंतु, त्यातील एक अशी नदी आहे जी नेहमी उलट्या दिशेत वाहते. ही दुसरी कुठली नाही तर नर्मदी नदी आहे.
नर्मदा नदी ही आकाशाची कन्या मानली जाते आणि म्हणूनच ती खूप पवित्र नदी असल्याचे सांगितले जाते.
वैज्ञानिकांच्या मते, नर्मदा उलट्या दिशेत वाहण्यासाठी रिफ्ट दरी कारणीभूत आहे.
रिफ्ट व्हॅलीमुळे नदी वाहण्याचा जो उतार असतो तोच उलटा बनला आहे. याच कारणामुळे नर्मदा नदी ही उलट्या दिशेत वाहते.
नर्मदा ही मध्य प्रदेश आणि गुजरातची मुख्य नदी आहे. ही नदी एकूण 1 हजार 77 किलोमीटरचे अंतर पार करते.
मध्य प्रदेशमधील अनूपपुर जिल्ह्यातील अमरकंटक पठार हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे.
नर्मदा नदी ही पुढे अरबी समुद्रास जाऊन मिळते. काही ठिकाणी नर्मदा नदीला रीवा नदी असे सुद्धा संबोधतात.
भगवान शंकराचे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.