सध्या कोणताही समारंभ असो पण तो साजरा करताना केक कापण्याची प्रथा आता रूढ होऊ लागली आहे.
केक हा असा गोड पदार्थ आहे जो कधीही खाल्ला जाऊ शकतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
बऱ्याचदा केक विकत घेताना तो शिळा आहे की ताजा हे कसे कसे ओळखायचे अनेकांना कळत नाही. तेव्हा काही टिप्स जाणून घेऊयात.
काही केक एग्लेस असतात तर काही केक अंड वापरून तयार केले जातात.
एग्लेस केक हा बराच काळ टिकतो आणि चांगला राहतो तर त्या तुलनेत अंड्याचा केक हा लवकर खराब होतो.
कोणताही केक विकत घेताना त्याचा वास येत नाही ना याची खबरदारी घ्या. केकला विचित्र वास येत असेल तर असा केक शिळा किंवा खराब झालेला असू शकतो.
शिळ्या केकवर पाण्याचे थेंब पडल्यास ते गोठतात. असा केक विकत घेणे शक्यतो टाळावे.
केक खरेदी करताना त्याच्यावरील एक्सपायरी डेट पाहून घ्या.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जुना केक खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. अशा केकमध्ये जिवाणू तयार होतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)