चाळीशीतील लोकांना अचानक हार्ट अटॅक येण्यामागची कारणं काय?
काही वर्षांपूर्वी 40 वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका येणे अत्यंत दुर्मिळ मानले जात होते.
परंतु आता त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी ही एक वैद्यकीय स्थिती आहे. हा एक अनुवांशिक आजार आहे.
हृदयाचे स्नायू जाड झाल्याने हृदयाला रक्त पंप करणे कठीण होऊ शकते.
काही लोकांमध्ये, रक्तवाहिन्या आधीच जाड झाल्यामुळे लक्षणे दिसतात.
मधुमेह हा गेल्या काही वर्षांपासून हार्ट अटॅकला कारणीभूत ठरत आहे.
आजकाल वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या अधिक दिसून येत आहे.
तुम्ही निरोगी असाल पण तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही तुमच्या सर्व अवयवांवर जास्त काम करण्यासाठी दबाव टाकत आहात.
धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकाराच्या झटक्यासाठी सिगारेट हा प्रमुख धोका घटक आहे
जिममध्ये जाणाऱ्या व्यक्तींना देखील हृदयविकाराचा झटका येतो.