401-600: जनरल Second Class, 601-700: 2L सिटिंग जन शताब्दी चेअर कार, 701-800: सिटिंग कम लगेज रॅक, 801+ : Pantry car, VPU, RMS mail coach, generator car, इत्यादी, अशी या बोग्यांची विभागणी आहे.
001-025: एसी First Class, 051-100: एसी 2T, 101-150: एसी 3T, 151-200: एसी चेअर Car, 201-400: स्लीपर 2nd Class.
या पाच आकडी क्रमांकांपैकी पहिले दोन आकडे ती बोगी नेमकी कोणत्या वर्षात तयार करण्यात आली आहे हे दर्शवते. अखेरचे तीन आकडे हे ती बोगी किंवा तो रेल्वेचा डबा कोणत्या श्रेणीचा आहे हे सांगतात. यातही विभागणी असते.
हा आकडा दर्शनीय स्थळी असल्यामुळं तो आपलं लक्ष वेधतो खरा. पण, त्याबाबत आपल्यातली फार क्वचित मंडळी विचार करत असतील. तुम्ही कधी या पाच आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ काय? याचा विचार केला आहे का?
सहसा रेल्वे गाड्यांच्यां डब्यांवर बरंच काहीतरी लिहिलेलं असतं. यामध्ये एक पाच अंकी क्रमांक जरा जास्तच मोठा आणि ठळकपणे लिहिलेला असतो.
मैलोंचा प्रवास करत आपल्याला अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या या रेल्वेला तुम्ही कधी निरखून पाहिलं आहे का? ही माहिती वाचून यापुढे नक्की तसं कराल.