कोण होता भारताचा सर्वात मोठा गद्दार? ज्याच्यामुळे आपल्याला आली होती गुलामीची वेळ
भारताचा इतिहास पाहिला तर तो शौर्य आणि बलिदानाने भरलेला दिसतो.
पण या इतिहासात एक असा देशद्रोही होता ज्यामुळे भारतावर गुलामीची वेळ आली होती.
त्या देशद्रोहीचं नाव मीर जाफर होतं. त्याच्यामुळे इंग्रजांनी भारतात आपले पाय रोवले.
इतिहासातील सर्वात मोठा देशद्रोही म्हणून मीर जाफरचं नाव घेतलं जातं.
मीर जाफर हा बंगालच्या नवाब सिराज - उद - दौलाचा सेनापती होता. त्याला नवाब व्हायचं होतं. त्यामुळे तो इंग्रजांशी सामील झाला आणि त्यांचा विश्वासघात केला.
मीर जाफरने 1757 मध्ये नवाब सिराज - उद - दौलाचा विश्वासघात केला आणि त्यामुळे सिराज - उद - दौलाचा पराभव झाला.
हा तो काळ होता जेव्हा इंग्रज भारतात आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते. मीर जाफरच्या या विश्वासघातामुळे इंग्रजांना भारतात राजवट पररवणे सोप झालं.
मीर जाफरने इंग्रजांना ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भारतात आपला पाय रोवण्याची संधी मिळाली. भारतात ब्रिटिश राजवटीचा पाया घातला गेला.
मीरचा विश्वासघातामुळे त्याचा हवेलीचं नाव नमक हराम की कोठी असं ठेवण्यात आलं. आजही मीर जाफर हे नाव लहान मुलांचं ठेवायला कोणी तयार नाही.