हे आहे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यापासून साधारण 4500 मीटरच्या उंचीवर असणारं काकभुशूंडी ताल (Kakbushundi Tal), अर्थात काकभुशूंडी तलाव. हिमालयातील सर्वात पवित्र तलावांपैकी एक, अशी मान्यता असणारं हे तलाव 1 किलोमीटर अंतरावर पसरलं आहे. नैसर्गिक महत्त्व असण्यासोबतच हे तलाव त्याच्या पौराणिक मान्यतांमुळंही चर्चेत असतं.
असं म्हणतात की या तलावाचं नाव रामायणातील पात्र, काकभुशूंडीच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. पौराणिक मान्यतेनुसार याच तलावापाशू काकभुशूंडीनं कावळ्याच्या रुपात असणाऱ्या गरुडरुपी देवाला रामायणकथा ऐकवली होती.
लोमश ऋषींच्या शापामुळं काकभुशूंडी कावळा झाले होते. या शापापासून मुक्ततेसाठी त्यांना राम मंत्र आणि इच्छामृत्यूचं वरदान होतं. ज्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य कावळ्याच्या रुपात व्यतीत केलं.
काकभुशूंडीनं वाल्मिकींच्या आधीच रामायण पक्षीराज गरुडाला ऐकवलं होतं असं म्हटलं जातं. मेघनादानं जेव्हा प्रभू रामाला नागपाशानं बांधलं तेव्हा नारदाच्या सांगण्यावरून गरुडानं श्रीरामांना मुक्त केलं. तेव्हाच श्रीमाच्या देवत्वाती चाहूल गरुडाला लागली होती असा उल्लेख पुराणकथांमध्ये असल्याचं सांगण्यात येतं.
काकभुशूंडी हा एक ट्रेकही असून, इथं पोहोचलण्यासाठी हिमालयातील नद्या, दऱ्या आणि पर्वतं ओलांडावी लागतात. नीळकंठ, चौखंबा आणि नर नारायण शिखरांवरून या ट्रेकची वाट पुढे जाते. ज्यानंतर साधारण माशाच्या आकाराचा हा तलाव सर्व क्षीण दूर करतो.
काकभुशूंडी तलावासाठीच्या ट्रेकची सुरुवात किंवा हा प्रवास जोशीमठहून सुरु होतो. जिथं तुम्ही भुईंदर गावातून घाघरिया मार्गे जाऊ शकता किंवा गोविंद घाट मार्गे तिथं पोहोचू शकता.
जॉली ग्रँट विमानतळापासून या ठिकाणाचं अंतर 132 किलोमीटर इतकं आहे. तुम्हाला विमानतळापासून या रहस्यमयी तलावापर्यंत पोहोचण्यासाठी कॅबही करता येऊ शकते. तर, रेल्वे मार्गानं यायचं झाल्यास येथील नजीकचं रेल्वेस्थानक आहे ऋषीकेश.