आज बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात हेल्दी ड्रिंक्सने करतात. काही लोक कढीपत्त्याच्या पाणीचं सेवन करतात.
कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अँटी ऑक्सिडंट्स, ए, बी, सी आणि ई जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉलिक अॅसिड, कॅरोटीन असे पोषक तत्त्व मिळतात.
पचन सुधारण्यासाठी हे फायदेशीर ठरतं. शिवाय बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही कढीपत्त्याचे पाणी प्यावे.
कढीपत्त्याचे पाणी निरोगी यकृतासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते.
कढीपत्ता केसांसाठी चांगला असतो, पण त्यात असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
कढीपत्तामुळे चयापचन वाढते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत होते.
मधुमेही रुग्णही हे पेय त्यांच्या आहारात समाविष्ट करू शकतात. हे रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.
कढीपत्त्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात लोह आणि फोलेट असते जे अॅनिमियाशी लढण्यास मदत करतं.
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित करण्यास मदत मिळते आणि त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास फायदा होतो.
मूठभर कढीपत्ता घ्या आणि पाण्यात उकळा, नंतर थोडं थंड झाल्यानंतर गाळून प्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)