आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात सांगितले आहे की, माणसाने आयुष्यात या दोन गोष्टींपासून कधीही घाबरू नये.
चाणक्य म्हणतात की बदल ही जीवनाची प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला कधीही घाबरू नये.
जो एखादा व्यक्तीला बदलाची भीती वाटत असेल तर तो कधीही आपले ध्येय साध्य करू शकत नाही.
चाणक्य यांच्या मते, बदलामुळे आपल्या जीवनात नवीन संधी आणि अनुभव येत असतात. त्यामुळे त्याचा सकारात्मकपणे स्वीकार केला पाहिजे.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जीवनामध्ये संघर्षाला कधीच घाबरू नये. संघर्ष करणारी व्यक्ती आतून खंबीर असते. त्यामुळे संघर्षाला घाबरणारी व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही.
संघर्षातून माणसाला त्याच्या क्षमतांची जाणीव होते. जो या दोन गोष्टींना घाबरतो किंवा लाजतो तो कधीही यशस्वी होत शकत नाही.