दारू ही आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते तरी सुद्धा दारूचं सेवन करणाऱ्यांची कमी नाही.
लोक वेगवेगळ्या दारूच्या ब्रँडचे शौकीन असतात.पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का दारू ही शाकाहारी आहे की मांसाहारी ?
बहुतेक लोकांना असे वाटते की दारू ही शाकाहारी आहे कारण ती फळं, उसाचा रस, ताडी यापासून बनवली जाते. परंतु दारू देखील मांसाहारी असू शकते का?
खरतर इसिंगलासचा वापर वाइन,बिअर आणि इतर काही कॉकटेल यांसारखे मद्य स्वच्छ करण्यासाठी किंवा फिल्टर करण्यासाठी केला जातो जो फिश ब्लॅडरपासून तयार केला जातो.
अंड्याचं पांढर घटक देखील कॉकटेल आणि वाइनमध्ये एजंट म्हणून वापरले जाते.मद्य खराब होणे किंवा तुरटपणा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
काहीवेळा जिलेटीन किंवा सौंदर्य उत्पादनांचा वापर देखील केला जातो.
मद्याच्या बाटल्यांवर हिरवे,केशरी किंवा लाल असे चिन्ह नसते. त्यावर फक्त अल्कोहोलचे प्रमाण आणि काही घटक लिहिलेले जातात परंतु संपूर्ण फॉर्म्युला नाही.
मद्य हे मांसाहारी असले तरी त्यामध्ये थेट मांस वापरले जात नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)