'हे' पान सोन्यापेक्षाही शुद्ध, रोज खाल्ल्यास उतार वयातही दिसाल तरुण
भारतात सुपारीचे पान मोठ्या प्रमाणावर वापरले जातं. सुपारीचे पान आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मालं जातं.
हे पान पचनास मदत करतं आणि त्वचेची, तोंडातील दुर्गंधी कमी करण्यास देखील मदत करतं.
विडाच्या पानांचे फायदे सांगल्यास तुम्ही आजपासून खाण्यास कराल सुरुवात.
संशोधनातून असं सिद्ध झालं की, या पानात बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध करतात. जखमा भरण्यास मदत करतात. तसंच हृदयाचे रक्षण करतात.
तुम्हाला बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅस आणि अपचनाची समस्या असेल तर अशा स्थितीत पानं खूप फायदेशीर मानली जातं. अन्न खाल्ल्यानंतर ते चघळल्याने पाचक एंजाइम सक्रिय होण्यास मदत होईल.
श्वासाची दुर्गंधी येत असेल किंवा तुमच्या हिरड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्हाला मदत मिळेल. या पानात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. त्यामुळे तोंडाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.
श्वास, खोकला आणि सर्दी यांवरही हे पान खूप गुणकारी मानलं जातं. यात काही संयुगे आढळतात जे तुमची फुफ्फुसे आणि श्वसन नळ्या स्वच्छ करतात.
या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. हे सांधे आणि स्नायूंमधील वेदना कमी करण्यास मदत मिळते. यामुळे सूज कमी होते आणि दुखण्यापासून आराम मिळतो. या पानाची पेस्ट करुन लागलेल्या ठिकाणी लावल्यास दुखणे कमी होतं.
विड्याची पानं हे डोकेदुखी किंवा मायग्रेनमध्ये देखील खूप मदत करतात. या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास आराम मिळतो.
विड्याची पान वजन कमी करण्यासही खूप मदत मिळते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)