सतत बदलत्या वातावरणामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात.
विशेषतः हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात आणि त्यात भेगा पडून रक्त येते.
कित्येक वेळा ओठ अतिशय काळे पडतात. आता घरगुती वस्तू वापरा आणि काळ्या ओठांपासून सुटका मिळवा.
नारळाच्या तेलासोबत मध आणि हळद या दोन वस्तू मिसळून नीट मिश्रण तयार करा.
लिंबाचा रस उपलब्ध असल्यास या मिश्रणात घाला.
यामध्ये लिंबाचा वापर डेड स्किन काढण्यासाठी केला जातो.
रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट ओठांवर लावा. लिप बाम लावण्याऐवजी हा घरगुती उपचार करू शकता.
या पेस्टचा नियमित वापर केल्याने ओठांतून रक्त येणे, काळे पडणे या समस्या दूर करता येतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)