आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी अकबर-बिरबलाच्या गोष्टी ऐकल्या असतील.
मुघल राजा अकबराच्या दरबारातील सर्वात हुशार सेवक अशी बिरबलाची ओळख होती.
बिरबल हा एक उत्तम योद्धाही होता. तो अनेकदा मैदानात उतरुन युद्धही लढला आहे.
आपल्या बौद्धिक चातुर्य आणि शौर्याच्या जोरावर बिरबलाने अकबराच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळवलं होतं.
अकबराच्या या सर्वात लाडक्या मंत्र्याचं खरं नाव बिरबल नव्हतं हे समजल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
बिरबलाचं खरं नाव महेश दास असं होतं. बिरबल हिंदू होता हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
बिरबलाला युद्ध भूमीमध्ये लढता लढता वीरमरण आलं होतं.
1586 मध्ये काही टोळ्यांविरुद्ध लढणाऱ्या आपल्या एका सरदाराला मदत करण्यासाठी बिरबल गेला होता.
अफगाणिस्तानमधील युद्धात बिरबलाचा मृत्यू झाला होता.
बिरबलाच्या मृत्यूनंतर अकबराने अनेक दिवस खाणं-पिणं सोडलं होतं. (फोटो एआयच्या मदतीने)