दिवाळी जवळ आली आहे आणि सगळीकडे मिठाई तयार व्हायला सुरूवात झाली आहे. या मिठायांमध्ये खवा सगळ्यात जास्त वापरला जाते.
पण तुम्हाला माहिती आहे का? भेसळयुक्त खवा आणि खरा खवा यातला फरक ओळखायचा कसा?
भेसळ असलेला खवा ओळखणं थोडं अवघड असतं. पण यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. जाणून घेऊया कोणत्या आहेत या पद्धती.
शुद्ध खव्यातून दुधाचा वास येतो. पण भेसळयुक्त खव्यातून कोणताच वास येत नाही.
शुद्ध खवा पाण्यात धुतल्यास ते पाणी घट्ट होते, तर भेसळयुक्त खवा पाण्यात धुतल्याने पाणी चिकट होते.
शुध्द खवा आगीवर धरल्यास हळूहळू वितळतो. याउलट भेसळ असलेला खवा लगेचच विताळायला लागतो.
भेसळयुक्त खवा खाल्याने पचना संबंधित त्रास होण्याची शक्यता असते. याशिवाय भेसळयुक्त खव्याचे पदार्थ खाल्यास वजनही मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)