टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकजण त्याला आपला फिटनेस आयकॉन मानतात.
कोहलीच्या फिटनेसचं गुपित हे फक्त त्याच वर्क आउट नाही तर त्याचा आहारही आहे.
विराट कोहलीने त्याच्या मुलाखतीत सांगितले एक काळ होता जेव्हा तो नॉनव्हेज खाण एन्जॉय करायचा. त्याला मांसाहारी पदार्थ खूप आवडायचे. परंतु एका आजाराने त्याचं आयुष्य बदललं.
कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं की, 2018 मध्ये त्याच्या शरीरात अचानकपणे वेदना व्हायच्या. काही टेस्ट केल्यावर समजले की त्याच्या शरीरात युरिक ऍसिड वाढतंय.
शरीरात वाढत असलेल्या यूरिक ऍसिडमुळे विराट कोहलीने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. कोहलीच्या म्हणण्यानुसार हा त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता.
नॉनव्हेज खाल्ल्याने शरीरात वाढत असेल्या यूरिक ऍसिडने केवळ यूरिक ऍसिडचं नाही तर आरोग्याच्या इतर समस्या सुद्धा वाढू लागतात.
नॉनव्हेजचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे हृदयाच्या समस्या होऊ शकतात.
नॉनव्हेजमध्ये जास्त कॅलरीज आणि फॅट्स असतात ज्यामुळे वजन वाढते आणि टाइप 2 डायबेटिजचा धोका सुद्धा वाढतो.
नॉनव्हेजचे जास्त सेवन केल्याने शरीरात ऑक्सलेटचा स्तर वाढतो जे किडनी स्टोन होण्याचं कारण ठरू शकतं.