लग्नानंतर वजन वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे जी बऱ्याच लोकांमध्ये होते. पण असं का होतं माहीत आहे का? चला जाणून घेऊयात
असे वजन वाढणे अगदी सामान्य आहे. त्यामागे अनेक छुपी कारणे असू शकतात. यामध्ये शारीरिक, भावनिक आणि जीवनशैलीतील बदलांचा समावेश होतो.
लग्नानंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. हे विशेषतः जेव्हा स्त्रीला गर्भधारणेची इच्छा असते तेव्हा घडते. त्यामुळे वजन वाढू शकते.
लग्नानंतर महिलांवर घरातील कामे, नातेसंबंधातील चढ-उतार, करिअरच्या चिंता इत्यादी गोष्टी येतात. यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
लग्नसमारंभात आणि त्यानंतरही अनेक कार्यक्रम होतात ज्यामध्ये भरपूर तळलेले पदार्थ खाल्ले जातात. यामुळेही महिलांचे वजन वाढू शकते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)