गतकाळात स्वयंपाकासंदर्भातील अशीच एक गोष्ट म्हणजे, लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याबाबतची.
घरातील थोरामोठ्यांच्या म्हणण्यानुसार लोखंडाच्या कढई किंवा तत्सम भांड्यांमध्ये जेवण शिजवल्यामुळं शरीरात लोहाचं पुरेसं प्रमाण राहतं आणि त्याचा फायदाही होतो.
पण, लोखंडाच्या कढईमध्ये काही भाज्या अजिबातच बनवू नयेत हे तुम्हाला कोणी सांगितलंय का?
लोखंडाच्या कढईमध्ये पालक, टोमॅटो, बीट कधीच बनवू नये.
अंडसुद्धा लोखंडाच्या कढईत न बनवण्याचा सल्ला दिला जातो.
व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असणाऱ्या भाज्या लोखंडाच्या कढईमध्ये रासायनिक प्रक्रियेतून जातात आणि त्या काळ्या पडू लागतात. यादरम्यान त्यातील पोषक घटकही कमी होतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)