कुरमूरे नरम पडतायत? 'या' स्मार्ट टीप्स वापरून तर पाहा....

Aug 08,2024

कुरमूरे

कुरमूरे अनेकांच्याच आवडीचे. वजनानं हलका भरणारा हा पदार्थ लहानग्यांपासून वयोवृद्ध मंडळींच्याही आवडीचा.

किचन टीप्स

हेच कुरमूरे जेव्हा नरम पडतात तेव्हा मात्र ते खाणं जवळपास अशक्यच असतं. त्यामुळं ते नरम पडू नये यासाठी काय करावं माहितीये?

हवाबंद डबा

कुरमूरे नरम पडू नयेत यासाठी एका हवाबंद डब्यात किंवा पॉलिथीन बॅगेत ठेवून द्यावेत.

लाह्यांचा डबा

ओलावा असणाऱ्या खणात किंवा कोपऱ्याच कुरमूरे, लाह्यांचा डबा ठेवू नका आणि सहसा या वस्तू असणारा डबा उघडा ठेवू नका.

सिलिका जेल

कुरमूरे नरम पडू नयेत यासाठी तुम्ही ही पिशवी जिथं ठेवत आहात तिथं सिलिका जेल पॅकेट ठेवू शकता. ज्यामुळं डब्यात बाष्प होणार नाही.

स्मार्ट टीप

कुरमूरे नरम झाल्यास ते ओव्हनमध्ये अथवा एखाद्या कढईत मंद आचेवर गरम केल्यास त्याचा कुरकुरीतपणा परत आणता येतो.

VIEW ALL

Read Next Story