नेहमीच्या चहाला करा गुडबाय; हिवाळ्यात करुन पाहा 'हे' आरोग्यदायी चहा

अनेक ठिकाणी सकाळची सुरुवात ही चहाने होते. पण नेहमीच्या चहाऐवजी तुम्ही काही आयुर्वेदिक चहाही करुन पाहू शकता.

Mansi kshirsagar
Dec 21,2023


या चहामुळं घशाला आराम मिळतो. तसंच सर्दी-कफ कमी होते आणि वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरते

तुळशीचा चहा

हा चहा करण्यासाठी तुळशीची पाने पाण्यासोबत उकळा. या चहामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो.

दालचिनी चहा

दालचिनीच्या काड्या पाण्यात उकळवून घ्या. यामुळं पचनशक्ती सुधारते आणि थंडीत शरीर उबदार राहते.

आले-लिंबू चहा

गरम पाण्यात ताजे आले, लिंबू आणि मध एकत्र करा. त्यामुळं पचनास मदत होते.

वेलची चहा

वेलची कुटून पाण्यासोबत प्या किंवा रोजच्या चहासोबक उकळवून घ्या. या चहामुळं शरीर डिटॉक्सिफाय करते आणि मुड सुधारते

बडीशेप चहा

बडीशेप अथवा बडीशेप पाण्यात उकळवून घ्या. या चहामुळं इन्फुजन ब्लोटिंग दूर करते आणि तोंडाची दुर्गंधी दूर करते

अश्वगंधा चहा

अश्वगंधा पावडर तुमच्या नेहमीच्या चहामध्ये किंवा पाण्यात मिसळून प्या. शरीरातील उर्जा वाढवते आणि मानसिक ताण कमी करते.

VIEW ALL

Read Next Story