भाताचे, किंबहुना तांदळाचे कैक प्रकार असले तरीही पांढरा भात जगभरात अतिशय आवडीनं खाल्ला जातो.
साधा भात असो, किंवा मग इडली, डोसा आणि तत्सम पदार्थांसाठीचा मूळ घटक असो. तांदळाचा वापर सर्रास होताना दिसतो.
दैनंदिन आहाराचा अविभाज्य घटक असणारा हाच भात महिनाभर न खाल्ल्यास काय होतं माहितीये?
तांदळामध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि इतर पोषक घटकांचा भरणा असतो. महिनाभर भात न खाल्ल्यास शरीरात या घटकांची कमतरता जाणवू लागते.
आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्या म्हणण्यानुसार भातामध्ये / तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं महिनाभरासाठी त्याचं सेवन टाळल्यास वजन घटण्यास सुरुवात होते.
भात, त्यातही साधा पांढरा भात तंतुमय घटकांचा उत्तम स्त्रोत असतो. त्यामुळं पचनक्रिया सुरळीत राहते. पण, भाताचं सेवन टाळल्यास पोटाच्या समस्या उदभवतात. (वरील माहिती सामन्य निरीक्षणावर आधारित असून, आहारविषयक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)