मुलाला जन्म देणं आणि त्याचं पालनपोषण करणं हा प्रत्येक महिलेसाठी एक आनंदाचा क्षण असतो.
परंतु, या जगात असे सुद्धा काही प्राणी आहेत, जे आपल्या मुलांना जन्म दिल्यानंतर स्वत: हे जग सोडून जातात. या प्राण्यांना आपल्या मुलांचा सहवास कधीच लाभत नाही.
मादा ऑक्टोपस आपली अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत: उपाशी राहते आणि अंड्यातून पिल्लं बाहेर निघल्यावर जास्त थकवा जाणवल्यामुळे मरण पावते.
सेमेलेशन हा एक समुद्री कीडा आहे जो आपल्या मुलांना जन्म दिल्यानंतर मरण पावतो.
साल्मन मासा अंडी दिल्यावर लगेचच मरण पावतो.
हूबर्ट केल्प हा प्राणी आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ एकाच मुलाला जन्म देऊ शकतो. एका मुलाला जन्म दिल्यानंतर हा प्राणी सुद्धा आपला जीव गमावतो.
मेफ्लाय हा कीटक अंडी देतानाच मरण पावतो. मेफ्लाईचं आयुष्य हे काही दिवसांचंच असतं.