तुळशीचं रोप हे फार औषधी असून त्याला धार्मिक महत्व असल्याने ते जवळपास प्रत्येकाच्या घरी असतं.
हिवाळ्यात बऱ्याचदा तुळशीचं रोपं सुकत अशावेळी नेमका काय उपाय करावा याविषयी जाणून घेऊयात.
थंडीच्या दिवसांमध्ये तुळशीचं रोप हे पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. तुळशीच्या रोपासाठी थेट सूर्यप्रकाश खूप महत्वाचा असतो.
खूप थंडी असेल तर तुळशीचं रोप घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे पुरेसा प्रकाश येईल.
हिवाळ्यात तुळशीच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही परंतु जर माती आणि मुळ सुकायला लागली असतील तर पाणी जरूर द्यावे. तुळशीला दिवसातून एकदा पाणी घालावे.
काहीवेळा कुंडीतील माती घट्ट होते आणि त्यामुळे झाडाची सुपीकता कमी होऊ लागते. अशावेळी वेळोवेळी माती बदला तसेच खताचा वापर करा.