भारतीय क्रिकेटर विराट कोहली ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन्ही मुलांसह मुंबईत परतला आहे.
सध्या वाईट फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीने प्रेमानंद स्वामींची भेट घेतली, यावेळी ते आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेले होते.
विराट आणि अनुष्काने आपली दोन्ही मुलं वामिका आणि अकाय यांना मीडियापासून दूर ठेवलं आहे. या दोघांचे चेहरे कॅमेऱ्यात कैद होऊ देत नाहीत.
परंतु अनुष्का शर्मा सोबत मुंबईत फिरताना अकाय कोहलीचा फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.
अतिशय गोंडस आणि क्यूट दिसणाऱ्या अकायला पाहून विराट आणि अनुष्काचे फॅन्स थक्क झाले.
फेब्रुवारी 2024 मध्ये विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आईवडील झाले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले.