तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोकं घड्याळ हे डाव्या हातातच घालतात.
बहुतेकवेळा पुरुषांसाठी असं म्हटलं जातं की त्यांनी घड्याळ नेहमी डाव्या हातात घालावं.
पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालावं?
घड्याळ डाव्या हातात घालण्यामागे काही वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत.
बहुतेकजण त्यांच्या उजव्या हातानेच सर्व काम करतात. अशावेळी जर घड्याळ सुद्धा उजव्याच हातात घातलं तर काम करण्यात अडचण निर्माण होऊ शकते.
घड्याळ डाव्या हातात घालण्याचं वैज्ञानिक कारण म्हणजे जर तुम्ही घड्याळ हे उजव्या हातात घातलंत तर घडाळ्यातील 12 अंक खालच्या बाजूला येतो. ज्यामुळे क्रम उलटा होतो. यामुळे तुम्हाला घड्याळ बघताना सुद्धा अडचण येते.
जर तुम्ही डाव्या हातात घड्याळ घातलंत तर यात 12 अंक वरच्या बाजूला येतो. यामुळे तुम्हाला घड्याळ पाहणं सोपं जातं.
हेच कारण आहे की घड्याळ नेहमी डाव्या हातात घालत जातं.